माझे मन तुझे झाले ,तुझे मन माझे झाले मना मनाचिये गुंती , राहिले न वेगळाले
बुधवार, १० ऑगस्ट, २०१६
तो बाहेर ... ती आत ...

दोघे एका गाडीचे प्रवासी
तो बाहेर ... ती आत ...
आणि दुनिया उभी दारात ...!!
" समिधा "
शनिवार, ६ ऑगस्ट, २०१६
होऊ नकोस पुन्हा, ती द्रौपदी ती सीता ...!!
वेलिलाही वाटे आता
आईपणाची भीती
कळ्यांना सांगे नका
गंधाळु फुलण्याआधी ...!!
की सांगावे कळ्यांना
उमलू नकाच केंव्हा ....
कळणार नाही तुम्हां
कुस्करल्या जाल केव्हा ...!!
मी रोज पहाते बाजारी
तुडवलेल्या कळ्यांना
अनं निर्माल्य झालेल्या
घरातल्या फुलांना ....!!
देव्हारी पुजली कधी
सरणांवर उधळली
योनी भोगांचेही भोग
त्यांच्या थोपलेले भाळी..!!
यावे कुणीही आणि
त्यांना चुरगाळून जावे
छिन्नविछीन्न पाकळ्यांना
इथस्थता फेकावे ...!!
हे संपणार कधी
कळ्यांचे कुस्करणे
उमलावे की नाही
की गर्भातच मिटणे ...!!
तरीही वेल सांगे
गर्भातल्या कळिला
तू उमल गंधाळून
स्मरून तव सृजनाला ...!!
तू जननी तू साधवी
तू लखलखती सौदामिनी
या केवळ उपमांनी
नको भाळूस तू रमणी ....!!
तू फुलवावे अंगार
तूझी गाजावी गाथा
होऊ नकोस पुन्हा
ती द्रौपदी ती सीता ...!!
" समिधा "
तू उमलतो मनामध्ये .....!!

आर्त आर्त एकांती
स्पर्श मुलायम काळोखी
रात्र हळवी जागत असते ....!!
स्वप्न नक्षत्री सजवत तेंव्हा...
तू उमलतो मनामध्ये .....!!.....!!
"समिधा "
शुक्रवार, २९ जुलै, २०१६
बुधवार, २० जुलै, २०१६
मंगळवार, १९ जुलै, २०१६
" ती ..............."
कित्येक रात्री ओशाळ जागते ती
ओढून रात्र , आत रडते ती ...!!
ते शृंगारून जातात रात सारी
आवरत राहते मनाचे पसारे ती...!!
कुणी भरावा गाभा रित्या प्रेमाचा
निखारे वासनेचे किती विझवी ती ...!!
हा जन्म गेला फुकाचा तरीही
जगण्यात मोक्ष कुठे शोधते ती...!!
ती जाळते शरीर धुमसते आतून
जीवात्म्याच्या त्वचेला किती जपेल ती ...???
" समिधा "
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट
(
Atom
)
