शुक्रवार, ८ फेब्रुवारी, २०१३

"प्रेम"





प्रेमा तुझा रंग कसा ...? कुणी सांगू शकेल का...?

प्रेम तर निशब्दातूनच हळुवारपणे उलगडते...फुलते ...बहरते..!

प्रेमाची भाषा काय असते.? आपल्या नजरेतून पाझरणारी 

आणि.... आपल्याही नकळत हृदयाला भिडते ...! 

प्रेमाचा गंध कसा...? श्वासातून दरवळणारा ... ! 

प्रेमाचा स्पर्श कसा ..? या देहीचे त्या देही.... 

आंतरिक आठवणीतूनही जाणवणारा.....!!!!

" मन वाट वाट पाही ....."!




मन दूर दूर जाई 
दूर सख्याच्या गावी 
मन आतुर आतुर 
घाली दारात रांगोळी.....! 

मन वर वर जाई 
वर झोकात अंबरी 
मन झाले इंद्रधनू 
बांधी तोरण अंबरी.....! 

मन वाट ... वाट पाही 
वाट  झाली ग . . .  उदास 
मन कातर . . . .कातर . . .
घेई कुशीत . . . .आभास ....!

   

                                              समिधा 

शनिवार, २ फेब्रुवारी, २०१३

"....नाते...."

अगदी पारदर्शक 

नजरांनी आपण 

एकमेकांना ओळखले होते.....!

आणि म्हणूनच ......

संवादाशिवाय बरोबर 

चालत होतो ......

की , सारे गृहीतच 

धरले होते.......?

कारण,

निरोप घेतांनाही 

कुठेच आकांत 

नाही,

पण तरीही 

आत ...... आत....

काहीतरी तुटल्याचे 

भास..... आभास 

होत होते ..........!!!!


!! गाठ !



तुझी माझी गाठ बांधली 
त्याला पंचवीस वर्षे लोटली 
या लोटलेल्या दिवसांची 
पानं उलटली .......
नुसतीच फरफट दिसली .....
चार वर्षात गाठीवर चार गाठी 
आणि वंशवृद्धीची
वेस गाठली.........!
पण .....
आपण आहोत तिथेच आहोत 
एकमेकाना समजून घेतांना 
तुझी रड , तुझा बहाणा 
माझी रग , कधी केविलवाणा.
आपली गाठ घट्ट आहे..
हा नुसताच हट्ट आहे ...!
वरच्या गाठी सैल 
होत नाहीत .....
तो पर्यंत 
अशीच .... अशीच...एकमेकांशी 
गाठ आहे....!!! 

"चारोळी"

  
                       पश्चिमेला डोंगराआड 
                       चंद्रकोर लपली .....!
                       अनं... चांदण्यांच्या सोबतीला 
                       रात्रच उरली ........!


                                                                "समिधा"

"तुझी भेट" ...?



Image result for girl and boy in love and nature paintings

तू  कधीतरी .....
एखाद्या वळणावर.....
नकळत भेटशील ....!!
तेंव्हा मनातील आंदोलनांना 
थोपवताना माझी
होणारी तारांबळ ....
तुला माझ्या नजरेत दिसेल...!!
ओठात हसू असेल
पण.... हृदयाची धडधड 
दाबून टाकेन ....आतल्याआत ....
आणि तेवढ्यात ....
डोळे देतील दगा .....!
आणि पाझरतील माझा 
निषेध झुगारून...
शब्द थरथरतील .....!
कारण ....
तू गेलास मान वळवून...
मागे वळून न पहाता ...!
मी अजुन तिथेच ..
त्याच वळणावर आहे ....
जिथे तू सोडून गेलास...
प्रश्नचिन्हासहित.......??????


                                              समिधा 




तुझ्या विरहात रे .......!




घन निळे झाले मन 

तुझ्या विरहात रे .......!
भरुनी हृदय गच्च झाले 
गंध श्वासात रे.......!
    
     भान सुटले मनाचे 
     कळा लागल्या जीवा 
     पाहता नभात रे......!

दाटुनी नभात जेव्हा 
घन व्याकुळ रडले 
साद माझीच ती 
एक तू...
आक्रोश धारांत रे ....!!!


                                  समिधा