बुधवार, ९ मार्च, २०१६

दीपकळीला जपायची आहे ....!


 

का तुझ्या माझ्यातल्या
या अदृश्य स्पंदनांना
मी  विस्कटू देत नाही   ....?
तलम मृदु स्पंदने
जपतानाची माझी धडपड
तुला दिसत नसेल पण
रात्रीच्या गडद अंधारात
चमकणारा  ठिपका
माझ्या डोळ्यांतले अश्रु
असतात हे तुला तुझे
डोळे मिटतांना दिसत
असतील   ...!
तेच तर मला हवे   ...
श्वासांची धड़धड़
होते आहे तोपर्यंत
तुझ्या माझ्यातल्या  या
अदृश्य स्पंदनांच्या
तेवत्या दीपकळीला
जपायची आहे   ....!

                     
                                   "समिधा"

शनिवार, ५ मार्च, २०१६

इतक्या वर्षांनंतर शेवटी ....!!




इतक्या वर्षांनंतर शेवटी
एकदा आपण भेटलो
त्या एका भेटीत
किती मागील - किती पुढील
कित्ती कित्ती बोललो  .....!
तुझी माझी आई कशी , बाबा कसे
आणि इतर सगळे ठीक का  ...?
आणि इतर मध्ये सगळे वगळून
कित्ती कित्ती बोललो  ....!!

तुझ्या माझ्या शब्दांमध्ये
पत्त्यांचा डाव होता
एक शब्द तुझा
आणि एक शब्द माझा होता
शब्दांमध्ये हरलो नाही
दोघेही आपण
हरले होते शब्द मात्र
तेंव्हा आपण थांबलो  .....!!!

बोलता बोलता डोळ्यांमध्ये
बरेच काही वाचले.
तुझे माझे आकाश तिथे
चांदण्यांनी व्यापले...
तरीसुद्धा एका कोप-यात
अश्रुंना रोखले....
अश्रुंना रोखतांना
पुन्हा पुन्हा हसलो  .....
इतक्या वर्षांनंतर शेवटी
पुन्हा एकदा हरलो    ....!!!!
पुन्हा एकदा हरलो    ....!!!!


                                            "समिधा"







शुक्रवार, २६ फेब्रुवारी, २०१६

" दे जरा हात तू नव्या पालवीचा ...."
























मी  तुला अनं तू मला
का ओळखीचे होऊन पहावे   ....?
खुप झाले खरे खोटे बहाणे
का आता जुन्या स्मृतीना स्मरावे   ..?
दे जरा हात  तू नव्या पालवीचा   ....
मीही फूलून येईन नव्याने   .... !
का आता जुन्या मुळाशी व्यर्थ खेळावे   ....?
देहात तुझ्या नव्या स्पंदनांना वाहु दे
मलाही जमेल आता भावंनांना समजावणे
का वृथा घालमेल ही जीवांची , सारे सावरावे   ..
मी तुला अनं  तू मला
पुन्हा नव्याने भेटावे   ....!!!
पुन्हा नव्याने भेटावे   .... !!!


                                                 " समिधा "

मंगळवार, २३ फेब्रुवारी, २०१६

" दारातला मोगरा गळून जातो..... !"



shahid soldiers wife साठी प्रतिमा परिणाम

कित्येक दिवसांत
तुझ्या येण्याची चाहूल लागली नाही ....
अचानक .... दारातला मोगरा फुलला की आपसूक
सुगंधि सकाळ चलबिचल होते    ...!
प्राजक्ताचा सडा दारात रांगोळी घालतो   ...
आणि मला वेडीला गोंधळात टाकतो   .....!
ती वेळ तू येण्याची नसते नं   ....!!
आणि तरी माझी लगबग,
साज चढवायची ... हातात चुडा भरून
कपाळभर कुंकु गोंदवायची   ....!
डोळ्यात चमकणारी रात्र लपवायची  ...!!
घरभर भिरभीर फिरून  संसार सजवायची   ...!!
साग्रसंगीत सुगरन विडा  सजवून
वाट पहायची   ....!!!

     दारातला मोगरा गळून जातो   ....
     प्राजक्ती सडा सुकून जातो   ...
     सारा साज उतरतो   ....
     सुग्रास संसार सारा बाजूला पडतो   ....
     जेंव्हा दारात तुझ्याशिवाय फ़क्त   ....
     राष्ट्रभक्तीचा ध्वज फडकतो    ....!!


                                  *** देशासाठी बलिदान करणा-या
                                         वीर जवानांच्या अर्धांगिनी वीरांगणींना समर्पित  ...!


                                                              "समिधा"

मंगळवार, २ फेब्रुवारी, २०१६

शब्द शब्द जपून ठेव ....!



" तुला दिलेले शब्द सहज दिले नाहीत   ...!
ती वचनं आहेत  .... !
निभावण्याची तुला आणि मलाही घाई नाही  ..
फ़क्त शब्द शब्द जपून ठेव   ....!
ती वचनं आहेत   ....!
मी ती कळ्यांसारखी माळली  आहेत   ....!
तू मोरपीसासारखे खोवून ठेव   ....
जेंव्हा कधी  माझी सय  येईल
उशाजवळ पसरून ठेव   ....!!


                                                 " समिधा "

गुरुवार, १४ जानेवारी, २०१६

" भावओले तुझे डोळे ...... "

 
भावओले तुझे डोळे
ह्रदयात उतरले....
कळलेच नाही
कधी हाती हात तुझे  आले....!

शब्दांची अडखळली पाऊलवाट
भावनांचे चंद्रचांदणे  पसरले
कळलेच नाही
कधी ईथवर आली नि:शब्द पाऊले....!

ह्रदयी धडधड अबोल गाणी
कितीक विरह अव्यक्तात जपले
कळलेच नाही
कधी तुझे मन माझ्या मनी उतरले...!

प्रित गातसे विरह विराणी
ह्रदयी स्मृतींचे वसंत जपले
कळलेच नाही
कधी दारी गुलमोहर बहरले.....!!!


                                                 " समिधा "

गुरुवार, ३१ डिसेंबर, २०१५

कधी केंव्हा नकळे ....! कवीवर्य मंगेश पाडगांवकरांना भावपूर्ण श्रद्धांजली !





कधी  केंव्हा नकळे
तुझ्या माझ्या  ....
जुळल्या होत्या तारा   ...!
प्रेमासाठी भुकेल्या आम्हा
देत होतास चारा   ....!
प्रेम म्हणजे प्रेम असते
तूच  शिकवलास धड़ा
तुमचे आमचे सेम असते
तोच गिरवला पाढा  ....!
प्रेमळाचा तू प्रेमदूत
कालिदास तू
मेघदूत  ...!
या जगण्यावर या जन्मावर
शतदा प्रेम करावे  ....
जन्म सार्थकी करण्याचा
मार्ग दाखविला थोरां   ... !
तो उत्साह   ... ती अभिव्यक्ति
स्रोत शोधावा कुठे   ...
तुमच्या ठायी  ... अवती भवती
तिथेच विरली धारा   ....!!
कधी  केंव्हा नकळे
तुझ्या माझ्या  ....
जुळल्या होत्या तारा   ...!
 


                                    " समिधा "