दाट गडद आठवण
हृदयात खोलवर
अनामिक हुरहूर लावते
आठवणींवर जगतात क्षण क्षण ....
मी तर क्षणाक्षणाने मरते .......!
आठवणीला मी दाबत नाही ..
तरीही ती दाट,गडद ,गहिरी होते
व्यापून माझे मनोविश्व
आठवण मीच होते .......!
आठवण म्हणजे
वणवण भटकणे मनाचे
भेटण्यासाठी..............!
आठवण म्हणजे
व्रण.. हृदयावर उमटलेल्या
प्रेमाचे ............
समिधा
आठवण म्हणजे
उत्तर द्याहटवाव्रण.. हृदयावर उमटलेल्या प्रेमाचे
Nice One!
तुमची कविता वाचता वाचता मलाही काही तरी सुचत गेले ...जसे सुचले तसे लिहीत गेलोय...
आठवण म्हणजे
गंध ... सहवासातल्या भासाचे
आठवण म्हणजे
बंध ... हव्या असणाऱ्या हव्यासाचे
आठवण म्हणजे
छंद ... स्वतःलाच तिच्याशिवाय छंदवीण्याचे
आठवण म्हणजे
रंग ... तिच्याशिवाय होळीत रंगण्याचे
आठवण म्हणजे
दंग ....स्वतःतच होण्याचे
आठवण म्हणजे
बांग .... मनातील पहाटेच्या स्वप्नाचे
आठवण म्हणजे
संग ....तिच्याशिवाय तिच्याबरोबर फिरण्याचे
..............................................
अजून काही तुम्हाला सुचते का ते पहा किवा कमीत कमी अंतरा पहा सुचत असेल तर...कविताच पूर्ण होईल :).