बुधवार, १६ जानेवारी, २०१३

***** एकांत *****

****** एकांत *****


एकांतात असतांना 


हळूच येवून खांदयावर 


हात टाकलास 


काही विचारण्या आधीच 


तुझे वादळी डोळे सांगून गेले 


मला भेटण्याची आतुरता,


नजर वळवून पाहिले आपण 


दूर क्षितिजाकडे.......


जमीन आस्मानामधलं अंतर 


पेलवत तो......


पाहत होता आपल्याकडे 


अनं ... अलगत तू खांद्यावरचा 


हात काढलास .....


तुझे वादळी डोळे आता 


शांत, निश्चल, निरभ्र होते.....


माझेच डोळे भरलेले 


तुझ्या पावली आता 


झुकले होते..........!!! 



                                  समिधा 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा