आठवते मज
तुझे ते
विद्रोही अग्नीतून
लपेटत जाणे
ज्वालांमध्ये स्वाहा
करुनी
आठवते मज
तुझे ते
धुमसत रहाणे .........
अन्यायाच्या क्षणापुरती
पेटून उठणे
आठवते मज
तुझे ते
थंड थंड होत जाणे .......
मज नकोत असे
विझलेले निखारे
नकोत हुंदके
आसवांचे झरे
मज नकोत
केवळ पेटलेले शब्द
नकोत केविलवाणे
हतबद्ध चित्त .....
मज हवे
स्वातंत्र्याचे गाणे
हाती मशाल
दौडत जाणे
अन्यायाच्या छाताडावर
तांडव करणे ........
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा