सोमवार, २८ जानेवारी, २०१३

"नाती".......!!




नाती कुणी जोडत नाही 
जडतात आपोआप...
काही तुटता तुटत नाही
कधी तुटतात आपोआप ......!

      नाती असतात ढगासारखी 
      कधी कोरडी, कधी कोसळणारी 
      नाती असतात कागदासारखी 
      सारं काही सहन करणारी .....

नाती असतात रंगात रंगलेली 
गंधात धुंदलेली 
आयुष्याबरोबर वाढत वाढत 
श्वासात भिनलेली .......!

       नाती असतात माती सारखी 
       जाल तिथे भेटणारी 
       वजा आयुष्य होता होता 
       शुन्याचा आधार देणारी ......!

नाती गिरिधर करांगुली सारखी 
आपलं दु:ख डोंगर पेलणारी 
अशाश्वत जीवन जगताना 
शाश्वत सुख देणारी.......!

  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा