सोमवार, २८ जानेवारी, २०१३

" आई माझी"



आई माझी.
एक आर्ष संगीत
आर्त भावनांचा आवेग
आयुष्यभर जळणारे गीत.....

आई माझी.
सारंग रागातील
एक मुसळधार तान
आता भैरवीची चढती कमान
पण समारोपाची उतरती जाण

आई माझी.
सप्तसुरांचे गांव
आरोह-अवरोहांचे तिथेच ठाव
गाण्यात तिच्या तोच
जुना ओला भाव
पण सारी म्हणती आता......
बंद कर तुझी ती
व्यर्थ कर्कश का ...व, का....व........!
व्यर्थ कर्कश का ...व, का ...व........!

२ टिप्पण्या :