सोमवार, २८ जानेवारी, २०१३

!! ओला पाऊस !!



ओला पाऊस  नाचे 
मना मना मध्ये साचे 
थेंबाथेंबात  आठवणी 
गाती तुझी माझी गाणी ....!

ओल्या पावसाची आठव 
झाली मनाची थरथर 
ओला शहारा आठवे 
चिंब चिंब झाले रातभर .....!

ओल्या मातीचा सुगंध 
तुझी सय होते दाट 
दाटलेल्या आसवांत 
ओल्या पावसाची वाट .......!
ओल्या पावसाची वाट .......! 



२ टिप्पण्या :