तुझी सय येता दिठी
हसू फुटे मज ओठी
ते सरले दिवस
नुसत्या आठवणी गाठी......!
तुझी सय येता दिठी
झाली आसवांची दाटी
तुला भेटायची आस
आड येते जगरहाटी........!
तुझी सय येता दिठी
केली मनास दमदाटी
तुझ्या पावलांचा भास
घाली मनाला मी मिठी ......!
तुझी सय येता दिठी
कळवळे उरपोटी
नको सय विसरूस
ठेव अंतरीच्या काठी......!
समिधा
समिधा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा