बुधवार, २७ फेब्रुवारी, २०१३

"अतृप्त......!!!!





काहीच मागे 
ठेवले नाहीस 
तुझी ओळख सांगायला ...!

तसे मागल्या दारी 
लावलेस आंबे 
मागे ठेवलेस शिंपायला ....!

काय कुठे गेल्या वाटा 
फाटे  फुटले नात्यांना 
येता जाता विचारतात 
काय आले वाट्याला ......?

दूर कोप-यात  तुझी आई 
ऊर बडवीत रडते आहे 
माझं बाळ ....माझं बाळ..
रात्रंदिवस रडते आहे ......!

तरुण विधवा तुझी पत्नी 
पोटात अंधार, जळते आहे....!
धर्म-अर्थ-काम-मोक्ष 
मधोमध फिरते आहे ......!

अतृप्त....अतृप्त.....अतृप्त...!!!!! 


                                                     "समिधा"

४ टिप्पण्या :

  1. काय कुठे गेल्या वाटा
    फाटे फुटले नात्यांना
    येता जाता विचारतात
    काय आले वाट्याला ......?

    आणि

    तरुण विधवा तुझी पत्नी
    पोटात अंधार, जळते आहे....!
    धर्म-अर्थ-काम-मोक्ष
    मधोमध फिरते आहे ......!


    ह्या ओळी खूपच सुंदर आहेत. धर्म-अर्थ-काम-मोक्ष ...खूप सुंदर !!!!!
    विधवेची वस्तुस्थिती ह्या चार शब्दात विधिलिखित होते (खरे तर अधोरेखित म्हणायचे होते मला पण...तिच्यासाठी विधिलिखितच ना हे?)

    उत्तर द्याहटवा
  2. तरुण विधवा तुझी पत्नी, पोटात अंधार, जळते आहे....! धर्म-अर्थ-काम-मोक्ष मधोमध फिरते आहे ......!

    This is a thought in this poem.
    Such a thought makes a bunch of words a "Poem"...

    उत्तर द्याहटवा