शुक्रवार, ८ मार्च, २०१३

"जगण्यावरचे प्रेम.....!

जगण्यावर प्रेम कर
असं तू नेहमी सांगतेस
पण .... आज जगणं
खूप महाग झालय ...!
प्रेम करावे तर आधी
खिसा बघतो ....!
तू काल वेणी मागितलीस
किमत पाहून
फक्त फुल आणले ....
पण तू नाही  हिरमुसलीस ....!
दिमाखात फुल केसात माळलस...!
पगाराला वाटा  तरी किती ....?
आईला वाण्याचे बिल द्याचे आहे ...!
बहिणीला फी भरायचे आहे ...!
बाबांची इच्छा कोण विचारतो ....?
त्यानाही केंव्हाची प्यायची आहे..!
घराचं भाडं  भरायचय ... !
महागाई किती ...?
गावी दुष्काळ .....!
बघितलं  इथलं जगणं .....?
किती महाग झालय ......!
आणि तू म्हणते
जगण्यावर प्रेम कर........!
पण तू मात्र जगण्यावर
खूप प्रेम करतेस ...!
जेंव्हा भेटतेस ...
नवा सूर देऊन जातेस ...!
नवी पहाट ....., नवे स्वप्न
फुलवून जातेस .....!
मग  मीही ...
नकळत जगण्यावर
प्रेम करू लागतो
नव्या उमेदिने नवं जीवन जगत राहतो.......!!!!!


                                                 समिधा

६ टिप्पण्या :

  1. खूपच छान!

    बाबांची इच्छा कोण विचारतो ....?
    त्यानाही केंव्हाची प्यायची आहे..!

    पण तू मात्र जगण्यावर खूप प्रेम करतेस ...!
    जेंव्हा भेटतेस ... नवा सूर देऊन जातेस ...!
    नवी पहाट ....., नवे स्वप्न फुलवून जातेस .....!

    हे पण मस्तच!

    उत्तर द्याहटवा
  2. एक गोष्ट observe केली. Blogचे time proper set नाही झाले आहे. ते please set करा. मी हि हा problem माझ्या Blog वर पहिला होता. settings मध्ये जाऊन GMT+5.5 India time set केल्यानंतर नवीन Blog ज corrected वेळेनुसार प्रकाशित झाले.

    उत्तर द्याहटवा
  3. Thanks Aadi... ! tumhi je time settingbabat mhatale te kahi kalale naahi...! ajun try karate..!

    उत्तर द्याहटवा
  4. मला वाटते बहुदा तुम्ही settings update केले आहेत. खाली स्टेप्स देतोय पहा तरी करून....
    1. Please go to your blogger main page with your log in.
    2. Observe left side of this page. You will find Overview, posts, pages, etc etc tabs. At the end you will find "Settings" tab.
    3. Click on it.
    4. Then again you will find "language & formatting" tab within "settings".
    5. click on "language & formatting" tab you will find on right side about "Formatting" details.
    6. Here you will find settings for Time Zone, Date Header Format, time stamp format & comment time stamp format. Please select GMT 5.30 standard India time under "Time Zone".
    7. For other tabs like Date header, time stamp & comment time, you can select the time format as you like.

    That's it!!!!

    Please confirm once done!

    उत्तर द्याहटवा
  5. आणखी एक सांगायचे होते. तुमच्या comments मराठी मध्ये लिहायच्या असतील तर google marathi font download करा.

    font PC मध्ये कसा सेट करायचा ते पण तुम्हाला google वर search केलात तर मिळून जाईल.

    उत्तर द्याहटवा
  6. comment लिहिताना English font आणि मराठी font कसा switch करायचा ते मि नंतर सांगेन.

    जर तुम्ही google marathi font वापरलात तर तुम्हाला तुमच्या कविता लिहायला पण सोपे जाईल.Marathi जसे English मध्ये लिहिता तसेच लिहिलात कि almost मराठी मध्ये पण तेच येते. example - "samidha" असे तुम्ही मराठी font select करून english मध्ये लिहिलेत कि "समिधा" असेच येते. मि या आधी बाकीचे मराठी fonts like "mangal" वापरून पाहिलेत ते मराठीत लिहिताना खूप त्रास देतात.

    Hope it is useful tips for you. If you already known it, please ignore this tip!

    उत्तर द्याहटवा