शनिवार, २३ फेब्रुवारी, २०१३

तुझ्या दिलेल्या वचनांचे ....!




तुझ्या दिलेल्या वचनांचे 
एक एक काळे मणी 
अंतरात जपून 
ठेवले आहेत .......!
तूला  आठवतही नसेल आता 
पण एकत्र घेतलेल्या अगणित 
श्वासांची शपथ.....!
तुझ्या बरोबर चालेल्या 
प्रत्येक पावलात सप्तपदींचे 
मंत्र जपत होते......!
तू परतणार नाहीस 
तरीही 
तुझ्या नावानेच 
आयुष्याचा उत्सव साजरा 
करणार आहे...!
तू नसतांना ... पण तरीही 
कुठेतरी तुलाच शोधतांना 
अंतरगाभा-यात प्राण तेवत 
आहे...!

६ टिप्पण्या :

  1. तुझ्या बरोबर चालेल्या
    प्रत्येक पावलात सप्तपदींचे
    मंत्र जपत होते......!

    - खूप सुंदर कल्पना!

    तुझ्या दिलेल्या वचनांचे
    एक एक काळे मणी
    अंतरात जपून
    ठेवले आहेत .......!

    इथे तुम्हाला "काळे मणी" हि संज्ञा मंगळसुत्रातल्या मन्याशी संबंध दर्शवायची आहे का?

    उत्तर द्याहटवा
  2. yes adi ur right...! hey u can understand my poem....! thanks adi.. please give me feedback abt my poems...! see u on blogg...

    उत्तर द्याहटवा