शनिवार, २३ फेब्रुवारी, २०१३

" आता कळते मला ......!





शोध घेता मी 
माझ्या स्रीत्वाचा 
प्राक्तनात जिच्या सदैव 
आरोप दुभंगलेपाणाचा 

उंबरठ्याच्या अल्याड म्हणे 
विश्व माझे उभे 
पल्याड तुझे काय आहे ....?
पोकळ आकाश रिकामे.

म्हणतात-
तू  गरुड ,ना घारही 
का वृथा शोध घेते....?
दुख:चा भार वाही ....?

हो .....! कळते मला 
मी ना गारूड , ना घारही 
पण तरीही म्हणते- 
चिमणी होऊन 
आकाशी झेप घ्यावी .....!

फुलपाखराला पंख 
दैवाने कारणाशिवाय 
दिले नाहीत 
माझ्या स्रीत्वाचा अपमान 
करू नका 
माझ्याशिवाय पर्याय नाही ...!

आता कळते मला 
नाती नाहीत बेड्या 
अडकून पडण्यासाठी 
दारे खिडक्या बंद करून 
गंजून जगण्यासाठी 

कळते तुम्हाला .....?
स्रीत्व म्हणजे केवळ 
बाई नाही 
आई आहे ...!
स्रीत्व म्हणजे
भोग नाही 
आग आहे 

आता कळते मला 
स्रीत्व माझे फेडण्यासाठी 
मीच शक्ती झाले पाहिजे 
अस्तित्व माझे मिटण्यापूर्वी 
मीच मला रोवले पाहिजे.......!
मीच मला रोवले पाहिजे.......!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा