बुधवार, १० एप्रिल, २०१३

एकेकीच्या अश्रुंमागे .....?



एकेकीच्या अश्रूंमागे
किती गूढ अंतरंग
चांदण्यांचे झाले निखारे
जाळी उभ्या आयुष्याचे अंग ....!

एक एक स्वप्न जागवत
ती घेई आकाशात झेप
तिचे उभारलेले हात
जरी छाटलेले पंख .......!

काळ लोटला लोटला
ती पुढे पुढे जाई
मागे आतुरलेले हात
तिला लावण्यास नखं .....!

बाई जन्म हा शापाचा
वाही जन्मभर हा भार
तरी जगणे होईल सुंदर
ठेवी उरात हा उ:शाप .......!




२ टिप्पण्या :

  1. खूप सुंदर कविता!!!!!

    स्त्रीची स्वप्ने आणि तिच्या स्वप्नांना तोडण्याचा होणारा प्रयत्न आणि तरीही उरी स्वप्ने घेऊन ती खरी करण्यासाठी पुढे जाणारी ती छान लिहिलीत.

    एक न एक कडवे सुंदर. प्रत्येक कडव्याचा शेवट अति सुंदर!
    चांदण्यांचे झाले निखारे! , सुंदर जगण्याचा उ:शाप , उभारलेले हात अन छाटलेले पंख सारख्या खूप छान छान कल्पना!

    तुमच्या कवितेना एक वेगळीच धार आणि उंची असते.

    उत्तर द्याहटवा