शनिवार, १६ मार्च, २०१३

तुझ्या विश्वाची मी एक लय .......!!!

काल परवा पर्यत   तुझ्या
विश्वाची मी एक लय .......
लयीत  अनेक सुर-बेसुर ताल ......
तालावर हलानारे-डुलनारे
मना मनाचे झोके ........
झोक्यावर पुन्हा पुन्हा
हेलकावणा-या तुझ्या आठवणी ....
आठ्वणीच्या  विश्वातला तू एक आता भूतकाळ ... ...
भूतकाळतल्या तुझ्या अस्तित्वात
मिटवु पहाणारी मी एक वर्तमान .......
वर्तमानात तुझ्याच गुंत्यात गुंतलेली
मी एक गाठ .......................
गाठीवर गाठी मारताना
घट्ट होणारी तुझी आठवण .........
आठवनिंच्या पीळत पीळवटुन निघणारी
मी ............ माझ्यासह खोलवर रुतलेला
तुझा भास् ......
अनं ... त्या भासातच , मी मला
जगवतेय , अनामिक अनंतकाल ..........!!!!!!


                                                                समिधा 


1 टिप्पणी :

  1. "अस्तित्वात मिटवू पाहणारी मी" थोडे अवघड जातेय समजायला. समजावून सांगाल का?

    उत्तर द्याहटवा