तुझ्या नावानेच जर ,
आयुष्याचा उत्सव साजरा
करायचे ठरविले आहे .....!
तर कशाला दुख-या
जखमांचा सोहळा करू .......?
तुझ्या बरोबरच्या अगणित
टिपक्यांची रांगोळी माझ्याभोवती रेखुन .......
कधीची उभी आहे .....
तुझ्याच आठवणींची तोरणे लावून ....
माझ्या प्राक्तनाच्या दारात .........!
तू आता परतणार नाहीस
याची खात्री आहे ...........!
तरी मंद प्राण तेवत
रहाणार आहे .........
माझ्या अंर्तगाभा-यात .....
तो पर्यंत, तरी तुझ्या नावाचा
सोहळा मी साजरा
करणार आहे ..............
तू नसतांना ...........
आणि
कुठेतरी तुलाच शोधतांना ............!!!
समिधा
shodhu naka yeto mi hahahahha.chan aahe madam !!
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाकुठेतरी तुलाच शोधतांना ............!!!
उत्तर द्याहटवाअजून तो मिळण्याची हळुवार अपेक्षा पण दिसते! :)
बहुतेक एकाच वेळी हि आणि चंद्राला ग्रहण ह्या कविता लिहिल्या असाव्यात...मागच्या कवितेतले ग्रहणानंतरचे दान मागणे...पुढे ह्या कवितेत सोहळ्यात convert झाल्यासारखे वाटते. इथे कवितेत विरहाच्या दुखांच्या जखमांना विसरून ..सुखाच्या आठवणींची ठिपकेदार रांगोळी काढण्याचा +ve ness पटला.
उत्तर द्याहटवाएका tv serial मध्ये (खूप कमी पाहतो पण छान होती - एका लग्नाची दुसरी गोष्ट..), प्रेमाचा शेवट विरहात झालेल्या एकाला तिची नवीन मैत्रीण (प्रियसी नव्हे!) सांगते. त्या प्रेमामुळे तुझ्यामाधला झालेला बदल ज्यामुळे तू आता इतकं उंच शिखरावर आहेस तो प्रेमाचा विजय आहे. ती मिळाली नाही तरी हि गोष्ट तू कसा काय विसरतोस?
हेच +ve thinking तुमच्या कवितेत दिसते.
मस्त आहे कविता!