खुल्या चांदण्यात
तुझी माझी भेट
हातामध्ये हात
अनं
स्वप्न डोळ्यांत .........!
खुल्या चांदण्यात
केला संसाराचा थाट
उन पाऊस झेलले
त्या भेटीच्या क्षणांत .........!
खुल्या चांदण्यांत
सरे रात्र ही वेगात
सुटे हातातला हात
स्वप्न पाठीशी घेउन
भेट .....धरी ...विरहाची वाट .......!
खुल्या चांदण्यात
पुन्हा .....
तुझी माझी भेट .......!!!
समिधा
समिधा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा