गुरुवार, २६ फेब्रुवारी, २०१५

तू आजही तसाच मोकळा अनं मी ....??


 


तू
चांदणझूल्यावर
झुलतोस तिथे
अनं  मी
प्रखर उन्हाच्या मखरात  …!!

तू मेंदिभरल्या 
पावलांचे ऐकतोस गुंजन 
अनं  मी 
रोज फिरते घेऊन 
शिव्या शापांचे आंदन  … !!

तूझे  रुपड़े रुबाबदार
रोज पाहतो  आरशात
अनं  मी
बापड़ी होऊन
डोके खुपसते अंधारात   …!!

तू काठावर प्रेमाच्या
अलगद तरंगत फिरलास
अनं मी
अथांग डोही बुडले
स्वप्नांचा  घेऊन ध्यास   … !!

तू पाठ फिरवली
तेंव्हा निष्कलंक , निर्मोही
अनं मी
पापिनी ,लज्जाहीन
दुरवर्तनी , दुराग्रही  .... !!

तू आजही
तसाच मोकळा
अनं मी
कोंडलेली
आत्माही कोंडला  …!!


                                       "समिधा "



५ टिप्पण्या :

  1. समिधाजी, तुमच्या लिखाणात खूप प्रगल्भता येते आहे.
    तू पाठ फिरवली
    तेंव्हा निष्कलंक , निर्मोही
    अनं मी
    पापिनी ,लज्जाहीन
    दुरवर्तनी , दुराग्रही .... !!


    या ओळी अप्रतिम.

    उत्तर द्याहटवा
  2. samidha madam aapan phar chan lihita. Mi sagar ( m. p.) la rahato parantu tumachya kavita ect. daily vachato . aapan khup lihave .

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. Dhanyavad Umesh ji...! Sagar M.P. la rahata? Marathi Aahat na? mag tikade kase gelat...? Maharashtrat ka nahi..? kutuhal mhanun vicharate...! any ways tumhi majhe lekhan aavadine vaschta tyabaddal khup dhanyavad c.u. !!

      हटवा
  3. तुमच्या ह्या कवितेतून प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे स्त्री-पुरुष असमानता.... परिस्थिती एकच पण समाजाची दोघांकडे बघण्याची विरुद्ध टोकाची नजर... हे कधी बदलेल माहित नाही...

    हि दाहकता अधिकच तीव्र होते तुमच्या ह्या काव्य पंक्तीतून...

    तू पाठ फिरवली
    तेंव्हा निष्कलंक , निर्मोही
    अनं मी
    पापिनी ,लज्जाहीन
    दुरवर्तनी , दुराग्रही .... !!

    तू आजही
    तसाच मोकळा
    अनं मी
    कोंडलेली
    आत्माही कोंडला …!!

    तुमच्या कविता उत्तरोत्तर खूप ताकदवर होत आहेत...
    तुम्ही तुमचा कविता संग्रह काढायला आता काही हरकत नाही...असे मला वाटते...
    आधीच असतील तर प्रश्नच नाही

    उत्तर द्याहटवा