ऐक नां...
थो...डी...शी जागा
कर नां आपल्या प्रेमाला ......!
घड्याळ्याच्या काट्याला मागे
करून माझा चेहरा पुढे आण..
खिडकीचा पडदा दूर सारून
बाहेरच्या मंद हवेला हळूच सांग
मला उठवायला ...!
आणि थो...डी....शी जागा
कर नां आपल्या प्रेमाला .....!
मस्त गरम चहा आणि सोबत प्रेमळ हाक .....
खिडकीत सुंदर फुलपाखरं आणि
सोबत मोग-याचा सुवास.....
अधीर मनाला जरा सांग नं आवरायला....!
आणि थो....डी....शी जागा
कर नां आपल्या प्रेमाला...!
असू देत ऑफीसला हजार कामं
आणि बॉसच्या मोबाईलचा
कलकलाट
त्या हजारांना शुन्यात आण
मोबाइला कर स्वीच्ड ऑफ अनं
माझ्यासाठी ह्रदयातून गां नं गझलचा
एक शेर एक मतला ....!
आणि थो....डी...शी जागा
कर नां आपल्या प्रेमाला...!!
तुझ्या शर्टचं तुटलेलं बटण
मी लावायला विसरले....
तुझ्या पांढ-याशुभ्र शर्टवर
माझ्या कपड्यांचा रंग लागला...
तू चिडू नकोस ....
फक्त ने नं
हसण्यावरी सगळ्याला....!
आणि थो....डी...शी जागा
कर नां आपल्या प्रेमाला ...!
काल भाजी तिखट आणि
पोळी वातड होती...
हे विसर आणि
म्हण नं त्या दिवशी तू गाजरचा
हलवा मस्त केला ......!
आणि थो....डी...शी जागा
कर नां आपल्या प्रेमाला..!
खोपातला पसारा
सोबत आपल्या चिमण्यांचा चिवचिवाट ....
एकदाच सारं घर गजबजून
जाऊ दे नं
उद्यापासून मी ड्युटीवर
तू फिरतीवर....
चिमणी पाखरांची नजर
आपल्या वाटेवर...
बघ नं किती आतूर आजचे क्षण
जगायला.....!
आणि थो....डी...शी जागा
कर नां आपल्या प्रेमाला...!!
"समिधा "
परिपक्वता आली आहे. सुंदर.
उत्तर द्याहटवाविजय सर नमस्कार! खुप खुप धन्यवाद!
हटवाkhupach chhan
उत्तर द्याहटवाभाऊ धन्यवाद !
हटवाकवितेंना विरह पण "वेगळा" जाणवतो आहे.. छान आहे..
उत्तर द्याहटवानमस्कार आदी वीज जी ! खुप खुप धन्यवाद!
हटवा