बुधवार, २ नोव्हेंबर, २०१६

जरा जरासा तुझा विरह........!

boy break up के लिए चित्र परिणाम


जरा जरासा तुझा विरह छळतो आहे!
जरा जरासा तुझ्याशिवाय कळतो आहे!

 

 फुकल्या सिगारेट कितीक वीरहात
धुरात तुझ्याच कविता वळतो आहे!

 

 मी ढोसली दारू कितीक पोटात
ओठात तुझेच घोट गिळतो आहे!

 

 मी फाडली फोडली चित्रे तुझी अवचीत
तीच आता इथून तिथून जुळवतो आहे!

 

 तू हलकेच निघून गेली जेव्हा चुकवून वाट...
ती वाट पुन्हा पुन्हा न्याहळतो आहे!

 

 तू दिसते जेव्हा जराशी हसतांना
हसण्यात त्या जरा जरासा पोळतो आहे!

 

 का अडकतोय पुन्हा तुझ्या रेशीमबंधात?
मोहात मीच मला का घोळतो आहे!

 

 पुरे झाला हा खेळ एकट्याचा
एकटा उगीच का मी जळतो आहे!

 

 मीही मांडतो माझा डांव नवा
नव्या डावांत नवे गाणे जुळवतो आहे!

 

 जरी कधी भेटलो चुकून कोठेही
भेट तशीच मजला जशी ओळखतो आहे!!

       

 

                                        © "समिधा "

२ टिप्पण्या :

  1. जुळवतो हा शब्द repeat झाला..नवीन काही सुचते का ते पहा..अजून एक "ळतो" आणि "ळवतो" यमक जुळत नाही.. नवीनच शब्द पहा.. सापडतो का ते..

    उत्तर द्याहटवा