मंगळवार, २५ जुलै, २०१७

प्रिय,💝


 

प्रिय,💝
तू जवळ नसतांना
तुला शब्दात बांधणं
सोप्प होतं....
जितकं तू जवळ असतांना
कठीण झालंय....
तू समोर नव्हतास
तेव्हा शब्दकळ्या
फुलून यायच्या
आसक्तीनं आणि ओढीनं
आरक्त व्हायच्या....
अनं आता
तू समोर आलास की,
शब्दांची एकएक पाकळी
गळून पडते
भावनांचे परागकण
उघडे पडतात
विरून जातात
वा-याच्या प्रवाहात....
तुला कळतंय का
शब्दांशिवाय
तुला माझ्याशी बांधून
ठेवणं...
किती कठीण झालंय...!

                                      

                                     ©  समिधा



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा