बुधवार, १२ एप्रिल, २०१७

" किती वेळा ....?"

Image may contain: 1 person, closeup


किती वेळा मला
डीलीट फीलीट करून
आत बाहेर करशील .....
किती वेळा लिहीशील माझ्यावर
माझ्यासाठी ?
एकदाच काय तो माझा आशय
ठरव...!
आणि संपव मला एकाच अर्थावर
जिथे तूला शांती अनं मलाही मुक्ती असेल....
फक्त एकच सांगते
परत परत मला खोडू नकोस
कवितेचे प्रारूप समजून !

                                            *** © " समिधा "

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा