
माझे मन तुझे झाले ,तुझे मन माझे झाले मना मनाचिये गुंती , राहिले न वेगळाले
शुक्रवार, १३ मे, २०१६
"किती जीव घेणे...!"

किती जीव घेणे...!
एकांती नको हा
फुलू दे मुग्ध ओठी
तुला रोज पहातो
अबोली गुलाबी
जरी जीव घेणे
बुधवार, ११ मे, २०१६
" तू भास ऋतूचा …! "
मी अनुभवलाच नाही
तुझा ऋतू ...
तो झोंबणारा पहाटवारा
अनं
अंगावरचा शहारा .......!!
मी आतुर ओल्या ऋतुच्या
बाहुपाशात येण्या
अनं
तू समीप ….
आत वैशाख वणवा पेटणारा …!!
तू भास ऋतूचा …
अनं
मी निरंतर
ऋतू कोसळणारा ….!!
मी ऋतूच्या काठावरची
तृष्णा ….
अनं
तू कोरडा ऋतू
कधी न बरसणारा ….!!
"समिधा"
गुरुवार, २८ एप्रिल, २०१६
तू जाऊ नको सखे......
तू जाऊ नको सखे,
का दीन हा मावळला
मावळल्या सांज दिशा
अनं परतीच्या पावलांची
हळवी झाली भाषा ....!!
तुझी भेट अशी सखे ,
चांदण्यातली हळुवार मीठी
पापण्यांवर ओठांची नक्षी
तू मोहरलेली अंतरंगी
मी अधीर मनी ...
अनं अशा हळुवार क्षणी
तुझी जाण्याची भाषा .... !!
अनं परतीच्या पावलांची
हळवी झाली भाषा ..... !!
तू भेट अशी सखे,
निरंतर लाटेसारखी
आवेग भरतीचा असुदे
किनारी मीलनाचा सोहळा
अनं अशा हळुवार क्षणी
नको निघण्याची भाषा .... !!
अनं परतीच्या पावलांची
हळवी झाली भाषा ....!!
" समिधा "
" प्राजक्ती प्रहर ...."

तुझ्या प्राजक्ती भेटीची
नकळे फुले सांडली दाराशी
अंन हलकेच खट्याळ प्राजक्ती गंध
कुजबुजला वा-यापाशी .....
मग धुंंद झाल्या दिशा ,
सांंजही आरक्ती .....
आता सांग सख्या .... हा
प्राजक्ती प्रहर आवरू कशी .....!!
" समिधा "
सोमवार, १८ एप्रिल, २०१६
" शब्दांना माहीत आहे ......!!! "
शब्दांना माहीत आहे
तुझ्या माझ्या रुसण्यात
शब्दांना सुट्टी असते
फ़क्त एकांती गुणगुणने
किंवा सुरेल शिट्टी असते ...!!
शब्दांना माहीत आहे
तू तशीच , तू तसाच
वादावादात जुंपलेलं
तरीसुद्धा ,
तुझे मन माझे मन
मनामनात गुंतलेलं ..... !!
शब्दांना माहीत आहे
रुसणं म्हणजे
नुसतं झुरणं
भल्याबु-या आठवणींच्या
गुंत्यात गुंतणं .....!!
शब्दांना माहीत आहे
रुसण्यात फ़क्त
मी तुला , तू मला
नजरेनं टाळतो
शब्द असतातच कुठे
तरीसुद्धा
तू माझे , मी तुझे मनामनात
अनेक अंदाज बांधतो ....!!
शब्दांना माहीत आहे
आपल्या आतलं भांडण
तुझ्या माझ्या नजरेतलं
दाटलेलं नभांगण
नभांगण बरसतांना
शब्द असतातच कुठे
तेव्हां फ़क्त तुझ्यामाझ्या
प्रेमाला मिठीचं कोंदण .....!!
शब्दांना माहीत आहे
आपल्या आतलं भांडण ....!!!
" समिधा "
गुरुवार, ७ एप्रिल, २०१६
सोमवार, ४ एप्रिल, २०१६
अगदी निरंतर......
अगदी निरंतर नव्या नवलाईने
जपते प्रेमाला ....
दिवसाला सुरुवात करताना
एक हलकिशी झुळूक यावी
तशी त्याची आठवण येते ....
मनाला सुखद थंडावा देते .....
गुणगुणतच सारा दिवस मग निघून जातो ,
हलकेच .... अलगद मला संध्येच्या
कवेत आणून सोडतो .....!!
" समिधा "
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट
(
Atom
)