बुधवार, १८ मे, २०१६

तुझ्या घनओल्या .....!




तुझ्या घनओल्या
पापण्यांची  व्यथा
सांगू नको   .....!!
इथे  शुभ्र
आकाश कोरड़ा
ओला श्वास
मागू  नको। ...!!


                                " समिधा "



                   

मंगळवार, १७ मे, २०१६

तुला शोधतांना......

 girl with nature साठी प्रतिमा परिणाम


तुला शोधतांना
किती ओलांडल्या वेशी.. 

शोधी खुण गाठ
जी येई तुजपाशी...

 

काही थोडे पाश
उरलेत मजपाशी
जुळवून पाहीन
थोडे तुजपाशी....

 

कळावे माझे श्वास
आतूर भेटण्यास
ठेवते उच्छश्वास
ओळखीच्या उंब-याशी...

 

कधी जाशील तिथून
गंध घेशील उरी
पुऩ्हा भिडशील
माझ्या आठवांशी...

 

                                                  "समिधा"

शुक्रवार, १३ मे, २०१६

"किती जीव घेणे...!"


 

तुझे लाजणे हे

किती जीव घेणे...!
लाजतांना पहाणे
किती जीव घेणे ....!

 

एकांती नको हा
असा दुरावा
दुरावा सहाणे
किती जीव घेणे...! 

 

फुलू दे मुग्ध ओठी
शब्दांचे चांदणे
चांदण्यात नहाणे
किती जीव घेणे...! 

 

तुला रोज पहातो
तू फुलते नव्याने
तुझ्या सवे फुलणे
किती जीव घेणे...! 

 

अबोली गुलाबी
तुझे उखाणे
तुला उलगडणे
किती जीव घेणे...! 

 

जरी जीव घेणे
सारे बहाणे
तुझ्यावीण जीणे
किती जीव घेणे...!

 

 

                          "समिधा"

 

बुधवार, ११ मे, २०१६

" तू भास ऋतूचा …! "

 


मी  अनुभवलाच नाही 

तुझा  ऋतू ...

तो झोंबणारा पहाटवारा    

अनं 

अंगावरचा  शहारा .......!!

 

मी आतुर ओल्या  ऋतुच्या

बाहुपाशात येण्या 

अनं 

तू समीप …. 

आत वैशाख वणवा पेटणारा …!!

 

तू भास ऋतूचा …

अनं

मी निरंतर 

ऋतू  कोसळणारा ….!!

 

मी ऋतूच्या काठावरची 

तृष्णा …. 

अनं 

तू कोरडा ऋतू 

कधी न बरसणारा   ….!!

 

 

                                      "समिधा"



गुरुवार, २८ एप्रिल, २०१६

तू जाऊ नको सखे......






तू  जाऊ  नको सखे,

का दीन हा मावळला

मावळल्या सांज  दिशा

अनं परतीच्या  पावलांची

हळवी झाली भाषा  ....!!

तुझी भेट अशी  सखे ,

चांदण्यातली हळुवार मीठी 

पापण्यांवर ओठांची नक्षी 

तू मोहरलेली  अंतरंगी 

मी अधीर मनी  ... 

अनं अशा हळुवार क्षणी 

तुझी जाण्याची भाषा    .... !! 

अनं परतीच्या पावलांची

हळवी झाली भाषा  ..... !!

तू भेट अशी सखे,

निरंतर लाटेसारखी

आवेग भरतीचा असुदे 

किनारी मीलनाचा सोहळा

अनं अशा हळुवार क्षणी 

नको निघण्याची  भाषा    .... !! 

अनं परतीच्या पावलांची

हळवी झाली भाषा  ....!!

 

                           " समिधा "  














" प्राजक्ती प्रहर ...."




तुझ्या प्राजक्ती भेटीची 

नकळे  फुले सांडली  दाराशी 

अंन  हलकेच खट्याळ प्राजक्ती गंध 

कुजबुजला वा-यापाशी   ..... 

मग  धुंंद  झाल्या दिशा ,

सांंजही आरक्ती   ..... 

आता सांग सख्या   ....  हा 

प्राजक्ती प्रहर  आवरू  कशी   .....!! 

 

                                              " समिधा " 

सोमवार, १८ एप्रिल, २०१६

" शब्दांना माहीत आहे ......!!! "

girl and boy साठी प्रतिमा परिणाम

शब्दांना  माहीत आहे
तुझ्या माझ्या रुसण्यात
शब्दांना सुट्टी असते
फ़क्त एकांती गुणगुणने
किंवा सुरेल शिट्टी असते   ...!!

शब्दांना माहीत आहे
तू तशीच , तू तसाच
वादावादात जुंपलेलं
तरीसुद्धा ,
तुझे मन माझे मन
मनामनात गुंतलेलं   ..... !!

शब्दांना माहीत आहे
रुसणं म्हणजे
नुसतं झुरणं
भल्याबु-या आठवणींच्या
गुंत्यात गुंतणं   .....!!

शब्दांना माहीत आहे
रुसण्यात फ़क्त
मी तुला , तू मला
नजरेनं टाळतो
शब्द असतातच कुठे
तरीसुद्धा
तू माझे , मी तुझे मनामनात
अनेक अंदाज बांधतो   ....!!

शब्दांना माहीत आहे
आपल्या आतलं भांडण
तुझ्या माझ्या नजरेतलं
दाटलेलं  नभांगण
नभांगण बरसतांना
शब्द असतातच कुठे
तेव्हां फ़क्त तुझ्यामाझ्या
प्रेमाला मिठीचं कोंदण   .....!!

शब्दांना माहीत आहे
आपल्या आतलं भांडण   ....!!!


                                                 " समिधा "