तू अशी कशी.........?
स्वत: पाझरलीस माझ्यासाठी
मला मात्र गोठ्वलेस
स्वत:मध्ये स्वत:साठी ......!
तुझे माझे नाते
असे कसे.......?
रंग ,रूप, नाव नाही
चौकटीची चौकट नाही
वर्तुळाचा परिघ नाही
तरीसुद्धा -
अनामिक बांध बांधलेस
अनिर्बंध सोबतीसाठी.....!
तुझ्या माझ्यात
किती अंतर ......?
जिथे क्षितिजाचा
ठाव नाही
साद असून
पडसाद नाही
पण -
श्वासांना रोखून धरलेस
माझ्या एका हाकेसाठी .......!!!
समिधा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा