सोमवार, २८ जानेवारी, २०१३

मन मोहना सजना



 मन मोहना सजना 
 वाट  पाहुनी 
 थकले   नयना ......

परतून येईन 
सांगून गेला ...
वसंत सरला 
शिशिरातही न अवतरला ....

 पालवी मनाची 
 करपून गेली ....
 घन डोळ्यात दाटले 
 परि मृगातही न बरसला .....

 तुझ्या स्मृतींची 
 वेचता फुले 
 मिटले नयनां
 पाही मन मोहन स्वप्नातला ....! 

  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा