शनिवार, ४ मे, २०१३

तू अनं मी........!!

तू चांदण्यांचे शिंपण 

अनं 

मी लाव्हारस होते ........!

तू शीतल गंध चंदन 

अनं 

मी स्वाह: समिधा होते ....!

तू निष्पाप -निरागस संवेदन 

अनं 

मी जाणिवांचे अंदोलन होते .....!

तू घेउनि आलास 

आयुष्य मिलनाचे बंधन 

अनं 

मी क्षितिजावरचे वियोगी 

आक्रंदन होते ........!


                             समिधा    










३ टिप्पण्या :

  1. खूप छान कविता! सर्व समर्पक! शीतल सुगन्ध चंदन आणि समिधा ह्या कल्पना सुंदर!

    "मिलनाचे बंधन?" कळले नाही. पण जर बंधन ह्याचा अर्थ रक्षा बंधन ह्यातल्या बंधन हा बहिणी भावा संबंधी तसाच प्रियकर प्रियसीच्या प्रेमासंबंधी असेल तर समजले.

    उत्तर द्याहटवा
  2. खूप छान समिधा………. शीतलता आणि लाव्हा दोन्ही प्रेमी युगालांचे प्रतिक,ताळमेळ बरोबर साधला आहे

    उत्तर द्याहटवा