शनिवार, ३० मे, २०१५

" तुला काय माहीत …"


 a alone indian woman  paintings साठी प्रतिमा परिणाम


तुला काय माहीत   …
जेंव्हा आपल्यात सर्व निरर्थक आहे
असं घडत होतं   … तेंव्हाच
नेमकं तुझ्या अस्तित्वाचा
अर्थ माझ्यात भिनत होता   …!
सर्व कागद कित्येकदा फाडलेत मी
ज्यावर तुझे नावं लिहीले होते   .
पण मनावर कोरलेले कसे खणून काढावं   …?
तुला काय माहीत   …
तू परत यावंस असं
वाटत होतं  पण   .... तेंव्हाच
नेमकं माझ्या अस्तित्वाचा
अर्थ बदलत होता    …!!!

                                            
                                                          " समिधा "

४ टिप्पण्या :

  1. तुम्ही अगदी वर्मावर बोट ठेवलंत...

    " मनावर कोरलेले कसे खणून काढावं..…? "
    हा प्रश्न सोडवण्यामागे माझे कितीतरी दिवस गेलेत पण उत्तर मिळालं नाही...
    आणि त्यावरून हे जाणवलं कि काही प्रश्नांची उत्तरे न शोधलेलीच बरी....
    अगदी माझ्या मनातलं लिहिलंत आपण...
    एकदम छान....

    उत्तर द्याहटवा