मंगळवार, २३ एप्रिल, २०१३

"येऊ नकोस असा"........!





येऊ नकोस असा
घेउन संदर्भ मागचे ........
तनामनावर उमटलेले
संदर्भ खुणांचे .......... !

नसानसातुन वाहते
तुझेच अबोल नाते
आत आत दडलेले
कढत कढत हुंदके ......!

येऊ नकोस पुन्हा
घेउन रूप दुस-याचे
श्वासात नसेल गंध तो
नुसतेच आकांत मनाचे ...!

तुझ्यातच एक वर्तुळ
आहे मागचे ......
शोध त्याचा घेताना
वर्तुळ भेदुन , संपून जायचे .....!!!


गुरुवार, १८ एप्रिल, २०१३

"आठवते का सखे" .........?






आठवते का सखे

म्हणाली होतीस मला....!

चल सख्या डाव

मांडू आपला ..........!

अनं चंद्र होता साक्षीला .........!

पण .........

डाव तुझा तू मांडला

अनं ............

डाव माझा मी मांडला......!

आता ..........

तुझा चंद्र   वेगळा

अनं .........

माझा चंद्र  वेगळा ........!!

               
                                            समिधा
               





सोमवार, १५ एप्रिल, २०१३

कविता: आपल्यामध्ये जुळू लागलेल्या - आसावरी काकडे

कविता: आपल्यामध्ये जुळू लागलेल्या - आसावरी काकडेhttp://samidh251972.blogspot.in/2013/04/blog-post_10.html

Atishay sundar kavita...! atishay bhavgarbha shabdat... manatil sambramachi andolane aani helkave amndali aahet...! khupch aapali vatavi ashi kavita.

आपल्यामध्ये जुळू लागलेल्या
नव्या नात्याची चिमुकली नाव
संभ्रमाच्या अथांग पाण्यात घालताना
मी कसनुशी झाले आहे !
माझे सज्ज सुकाणू
मी सर्व ताकदीनिशी
हातात गच्च धरून ठेवले आहे.

hya kavitechya oli tar pratyekachya manatil sambramacha aarasa vatatat....!

बुधवार, १० एप्रिल, २०१३

कोंडलेल्या आसवांनो

कोंडलेल्या आसवांनो
पावसात बरसायचे
ऋतूच्या या सोहळ्यात
एकटे नाही राहायचे ......!


     काय सांगावे पुढचे
     ऋतू येतील कोरडे
     दु:ख पडेल उघडे
     अनं  हसे तुमचे व्हायचे
कोंडलेल्या आसवांनो पावसात बरसायचे


     अति पावसाचे लाड
     नाही कुणी करीत
     आसवांनो तुम्हालाही मग
     नाही कुणी पुसायचे
  कोंडलेल्या आसवांनो
पावसात बरसायचे


     वहाता वहाता तुम्ही
     भानही ठेवायचे
     दूर कुठेतरी , कुणाचे
     घर आहे मातीचे
कोंडलेल्या आसवांनो
पावसात बरसायचे


   


काल, 12:30 6 comments

एकेकीच्या अश्रुंमागे .....?



एकेकीच्या अश्रूंमागे
किती गूढ अंतरंग
चांदण्यांचे झाले निखारे
जाळी उभ्या आयुष्याचे अंग ....!

एक एक स्वप्न जागवत
ती घेई आकाशात झेप
तिचे उभारलेले हात
जरी छाटलेले पंख .......!

काळ लोटला लोटला
ती पुढे पुढे जाई
मागे आतुरलेले हात
तिला लावण्यास नखं .....!

बाई जन्म हा शापाचा
वाही जन्मभर हा भार
तरी जगणे होईल सुंदर
ठेवी उरात हा उ:शाप .......!




शनिवार, १६ मार्च, २०१३

तुझ्या विश्वाची मी एक लय .......!!!

काल परवा पर्यत   तुझ्या
विश्वाची मी एक लय .......
लयीत  अनेक सुर-बेसुर ताल ......
तालावर हलानारे-डुलनारे
मना मनाचे झोके ........
झोक्यावर पुन्हा पुन्हा
हेलकावणा-या तुझ्या आठवणी ....
आठ्वणीच्या  विश्वातला तू एक आता भूतकाळ ... ...
भूतकाळतल्या तुझ्या अस्तित्वात
मिटवु पहाणारी मी एक वर्तमान .......
वर्तमानात तुझ्याच गुंत्यात गुंतलेली
मी एक गाठ .......................
गाठीवर गाठी मारताना
घट्ट होणारी तुझी आठवण .........
आठवनिंच्या पीळत पीळवटुन निघणारी
मी ............ माझ्यासह खोलवर रुतलेला
तुझा भास् ......
अनं ... त्या भासातच , मी मला
जगवतेय , अनामिक अनंतकाल ..........!!!!!!


                                                                समिधा 


तुला अखेरचा निरोप ......!!


     घट्ट थंडीत
     घट्ट मिठी
     तुझी प्रेमाची उब ......!!

     मिट्ट अंधारात
     मिट्ट चुंबन
     तुझी प्रित खूब .......!!

     घट्ट मिठीत
     मिट्ट चुंबन
     तुला अखेरचा निरोप ......!!

     घट्ट थंडीत
     मिट्ट अंधारात
     माझा अनावर शोक .......!!!!


                                     "  समिधा "