
माझे मन तुझे झाले ,तुझे मन माझे झाले मना मनाचिये गुंती , राहिले न वेगळाले
मंगळवार, २१ जून, २०१६
बुधवार, १५ जून, २०१६
शुक्रवार, ३ जून, २०१६
का हळव्या भासती दिशा ......
का हळव्या भासती दिशा
सखे सांग ना तुला भेटूनी परतती
म्हणूनी विरहाची का बोलती भाषा..?
मी अबोल मनी येथे दाबतो हुंदका
अनं बांध घालीतो भावनांना
सखे सांग ना दिशेपलिकडे
आकाश आठवांनी दाटते का ?
मी उध्वस्थ मनाच्या तळाशी
फुलवतो गुलमोहराची वस्ती
मी उजळतो कोनाडे अंधारी
सखे सांग ना तुझ्याही अंगणी
बरसतेस ना प्राजक्ताच्या राशी ...?
मी इथे एकटा तू दूर अशी
आपल्यात पसरल्या दिशा
तू तिथेच उभी पहा
मी इथून तुला पहातो
सखे सांग ना सांजवेळी
स्पंदनेच ना मोहरली क्षितीजाशी ...??
समिधा
गुरुवार, १९ मे, २०१६
किती भेटी झाल्या ....
किती भेटी झाल्या
मोजदात नाही ....!!
त्या थांबल्या वेळा तिथेच
थोडया पापण्यांत कैद
अनं .... आलिंगनात काही ...!!
"समिधा"
बुधवार, १८ मे, २०१६
तुझ्या घनओल्या .....!
तुझ्या घनओल्या
पापण्यांची व्यथा
सांगू नको .....!!
इथे शुभ्र
आकाश कोरड़ा
ओला श्वास
मागू नको। ...!!
" समिधा "
मंगळवार, १७ मे, २०१६
तुला शोधतांना......
तुला शोधतांना
किती ओलांडल्या वेशी..
शोधी खुण गाठ
जी येई तुजपाशी...
काही थोडे पाश
उरलेत मजपाशी
जुळवून पाहीन
थोडे तुजपाशी....
कळावे माझे श्वास
आतूर भेटण्यास
ठेवते उच्छश्वास
ओळखीच्या उंब-याशी...
कधी जाशील तिथून
गंध घेशील उरी
पुऩ्हा भिडशील
माझ्या आठवांशी...
"समिधा"
शुक्रवार, १३ मे, २०१६
"किती जीव घेणे...!"

तुझे लाजणे हे
किती जीव घेणे...!
लाजतांना पहाणे
किती जीव घेणे ....!
एकांती नको हा
असा दुरावा
दुरावा सहाणे
किती जीव घेणे...!
फुलू दे मुग्ध ओठी
शब्दांचे चांदणे
चांदण्यात नहाणे
किती जीव घेणे...!
तुला रोज पहातो
तू फुलते नव्याने
तुझ्या सवे फुलणे
किती जीव घेणे...!
अबोली गुलाबी
तुझे उखाणे
तुला उलगडणे
किती जीव घेणे...!
जरी जीव घेणे
सारे बहाणे
तुझ्यावीण जीणे
किती जीव घेणे...!
"समिधा"
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट
(
Atom
)
